लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी / निमसरकारी ( जिल्हा परिषद ) व सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात येणार आहेत . त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहेत .
महागाई भत्ता 42 टक्के : केद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4 टक्के तर सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 9 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे . या प्रमाणे राज्यातील सातव्या वेतन आयोगांमध्ये वेतन धारण करणाऱ्या सरकारी / पेन्शनधारकांच्या डी.ए मध्ये माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के वाढ करण्यात येणार आहे .
तर सहाव्या वेतन आयोगांनुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये केंद्र सरकारप्रमाणे माहे जानेवारी 2023 पासून 9 टक्के वाढ करण्यात येणार आहे , सध्या सहाव्या / असुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना / पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांना 212 टक्के प्रमाणे डी.ए देण्यात येतो आता यांमध्ये 9 टक्के वाढ म्हणजेच जानेवारी 2023 पासून एकुण 221 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लाभ अनुज्ञेय होणार आहे .
राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये वाढ करणेबाबत , वित्त विभागांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नस्ती सादर करण्यात आलेली असून , डी. ए वाढीबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय 30 जून 2023 च्या आत निर्गमित करण्यात येणार आहे .त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत राज्य कर्मचाऱ्यांकडून मोठी मागणी होत असल्याने , केंद्र सरकारप्रमाणे तसेच इतर 25 राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे करणेबाबत , मुख्यमंत्री यांच्या सोबत कर्मचारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात येणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर , Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !