Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta , pension , retirement age 60 year update ] : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन , वाढीव 4 टक्के महागाई भत्ता तसेच निवृत्तीचे वय 60 वर्षे इ. 14 मागण्या मान्य करण्याचे मा. मुख्य सचिव यांचे दिलासायक निर्वाळा दिनांक 24 जुन 2024 रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांच्या समवेत झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे .
यांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक 01 मार्च 2024 पासुनच राहील व त्याप्रमाणे शासकीय आदेश पारीत होतील असा निर्वाळा मा. मुख्य सचिव श्री. नितीन करीर यांनी चर्चेसमयी दिले आहेत . तसेच केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 टक्के महागाई भत्ता मंजूर करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .तसेच सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करणेबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आले असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच निवृत्तीवेनताच्या अशंराशीकृत भागाची देय रक्कम बारा वर्षाने पुनर्स्थापित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहेत . तसेच वार्षिक नियतकालीन बदल्या संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही , मात्र विनंती बदल्या संदर्भातील प्रकरणे मा. मुख्यमंत्री पातळीवर निकालात काढली जातील असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागांकडून प्रस्ताव आल्यास , योग्य विचार केला जाईल , तर वाहन चालक रिक्त पदभरतीबाबत सद्यस्थितीचा अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांबाबत सद्या शासनाचे धोरण सहानुभूतीचे आहे , तर प्रतिक्षा यादीतील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबत विचार केला जाईल असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच सेवानिवृत्ती उपदान रुपये 14 लाखांऐवजी 25 लाख रुपये निश्चित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे , असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ देण्याबाबतचा उद्देश लक्षात घेवून या प्रश्नाबाबत नव्याने अभ्यास केला जाईल असे नमुद करण्यात आले आहेत . अशा विविध 14 मागण्यांवर सकारात्मक चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली , याबाबतचे सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..