Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state Employee mahagai Bhatta increase news ] : राज्यातील शासकीय , निमशासकीय तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ हा येत्या पावसाळी अधिवेशनांमध्ये होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे .
पावसाळी अधिवेशनाला दिनांक 27 जुन पासून सुरुवात : महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जुन ते दिनांक 12 जुलै 2024 या कालावधीमध्ये होणार आहे . यांमध्ये अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करुन निर्णय घेतले जाणार आहेत . तर राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दिनांक 28 जुन रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडले जाणार आहेत .
यावेळी पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जुन ते 12 जुलै या तेरा दिवस कामकाज चालणार असून दिनांक 29 जुन रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखिल विधीमंडळाचे कामकाज सुरु राहणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . यांमध्ये शेतकरी , कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहेत .
शासकीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीवर निर्णय : महाराष्ट्र राज्यातील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषद ) तसेच निवृत्तीवेतन धारकांना केंद्र सरकारने दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन लागु करण्यात आलेल्या 4 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबत अधिकृत्त निर्णय सदर हिवाळी अधिवेशनांमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .
जानेवारी पासुनचा मिळणार डी.ए फरक : सदरचा वाढीव डी.ए हा जानेवारी पासून लागु करण्यात येणार असल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मे या कालावधीतील डी.ए फरक मिळणार आहे . पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जुन ते 12 जुलै या कालावधीत होणार असल्याने , 30 जुन पर्यंत डी.ए वाढीचा निर्णय घेतल्यास , राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुन पेड इन जुलै वेतनासोबत डी.ए लाभ लागु होईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.