Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta da vadh nirnay ] : केंद्र शासनांकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करणेबाबत , अधिकृत्त निर्णय निर्गमित होवून 4 महीने झाले तर राज्य शासनांकडून राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबाबतचा निर्णय घेण्यात आला नाही . यामुळे राज्यातील कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून डी.ए वाढीची प्रतिक्षा करीत आहेत .

केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत 4 टक्के डी.ए वाढीची घोषणा होणार : सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातुन दोनदा जानेवारी व जुलै महिन्यांत डी.ए वाढ करण्यात येते , तर या वर्षातील जानेवारी मधील डी.ए वाढ झालेली असून , माहे जुलैची डी.ए वाढ नियोजित आहे , याबाबत केंद्र सरकारकडून पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 54 टक्के पर्यंत वाढेल .

राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ कधी मिळणार ? : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु करणेबाबत मा.मुख्य सचिव यांच्या बैठकीत डी.ए वाढीबाबतचा अधिकृत्त निर्णय 11 जुलै पर्यंत ( पावसाळी अधिवेशन दरम्यान ) घेतला जाईल , अशी ग्वाही मा.मुख्य सचिव यांनी दिलेली आहे . त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत याबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .अथवा जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शासन निर्णय नक्की निर्गमित केला जाईल , अशी माहिती मिडीया रिपोर्टनुसार समोर येत आहे .

यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के ( 50 टक्के प्रमाणे ) महागाई भत्ताचा लाभ हा जुलै पेड इन ऑगस्ट वेतन देयकासोबत दिला जाणार आहे , तर निवृत्तीवेतन धारकांना देखिल जुलैच्या निवृत्तीवेतनासोबत सदर वाढीव महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे .

डी.ए फरकाची रक्कम : सदर वाढीव डी.ए हा माहे जानेवारी 2024 पासुन लागु होत असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना  / निवृत्तीवेतनधारकांना जानेवारी ते जुन या 06 महिने कालावधीमधील डी.ए फरकाची रक्कम जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत अदा केली जाणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *