लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.30 जून 2023 रोजी तीन GR निर्गमित करण्यात आलेले आहेत , सदर शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना 4 टक्के / 9 टक्के / 16 टक्के डी.ए वाढ करण्यात आलेली आहे .
यांमध्ये राज्य शासन सेवेतील असुधारित वेतन संरचनेत पाचव्या वेतन आयोगांमध्ये वेतन धारण करणाऱ्या शासकीय कर्मचारी व इतर पात्र पुर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय डी.ए च्या दरांमध्ये सुधारणा करुन महागाई भत्याचे दर हे 396 टक्के वरुन 412 टक्के असे सुधारित करण्यात आलेले आहेत . म्हणजेच डी.ए मध्ये एकुण 16 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे .
तर असुधारित वेतन संचरनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचारी व इतर पात्र पुर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 212 टक्के वरुन 221 टक्के अशी सुधारणा करण्यात आलेली आहे . म्हणजेच महागाई भत्तांमध्ये एकुण 9 टक्के इतकी वाढ जानेवारी 2023 पासून लागु करण्यात आलेली आहे .
सातव्या वेतन आयोगांनुसार वेतन धारण करणाऱ्या शासकीय / इतर पुर्णकालिक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अनुज्ञेय डी.ए चे दर हे 38 टक्के वरुन 42 टक्के अशी सुधारणा करण्यात आलेली आहे .म्हणजेच महागाई भत्तांमध्ये एकुण 4 टक्के वाढ दिनांक 01 जानेवारी 2023 पासून डी.ए फरकासह लागु करण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !