Spread the love

Live Marathipepar प्रतिनिधी [ State Employee Mahagai Bhatta Vadh GR ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी अधिकृत्त शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेले आहेत , यानुसार महागाई भत्तांमध्ये 15 टक्के , 9 टक्के व 4 टक्के डी.ए वाढ करण्यात आलेली आहे .

सातवा वेतन आयोग : यांमध्ये सातवा वेतन आयोगानुसार वेतन / पेन्शन घेणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना अनुज्ञेय महागाई भत्ताचे दर हे 42 टक्के वरुन 46 टक्के  ( 04 टक्के डी.ए वाढ ) करण्यात आलेले आहेत . सदर महागाई भत्ता फरक हा माहे नोव्हेंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत माहे जुलै ते ऑक्टोंबर कालावधी मधील डी.ए थकबाकीसह अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सहावा वेतन आयोग : सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन / पेन्शन घेणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना अनुज्ञेय महागाई भत्ताचे दर हे 221 टक्के वरुन 230 टक्के  ( 09 टक्के डी.ए वाढ ) करण्यात आलेले आहेत . सदर महागाई भत्ता फरक हा माहे नोव्हेंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत माहे जुलै ते ऑक्टोंबर कालावधी मधील डी.ए थकबाकीसह अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

पाचवा वेतन आयोग : पावव्या ( असुधारित वेतनश्रेणी नुसार ) वेतन आयोगानुसार वेतन / पेन्शन घेणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना अनुज्ञेय महागाई भत्ताचे दर हे 412 टक्के वरुन 427 टक्के  ( 15 टक्के डी.ए वाढ ) करण्यात आलेले आहेत . सदर महागाई भत्ता फरक हा माहे नोव्हेंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत माहे जुलै ते ऑक्टोंबर कालावधी मधील डी.ए थकबाकीसह अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर डी.ए वाढीमुळे राज्यातील शासकीय कर्मचारी / पेन्शनधारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे . या संदर्भात वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेले डी.ए वाढीचे जी.आर पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

01. 9% DA वाढ शासन निर्णय

02. 4% DA वाढ शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *