राज्य कर्मचारी रजा नियम : विशेष विकलांगता रजा व रुग्णालयीन रजा बाबत संपुर्ण माहिती , जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Leave Niyamavali see Detail ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा काळांमध्ये झालेल्या इजेबद्दल विशेष विकलांगता रजा व रुग्णालयीन रजा देण्यात येते , सदरची रजा कशी मंजुर करता येते , रजा कालावधीमध्ये कोणत्या प्रकारे वेतन मिळते या संदर्भातील संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

विशेष विकलांगता रजा : विशेष विकलांगता रजा ही हेतुपुरस्पर झालेल्या इजेबद्दल मंजूर करता येते , सदरची रजा ही स्थायी / अस्थायी कर्मचाऱ्यांना मंजूर होते . सदरची रजा ही विकलांगता झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यांच्या आतमध्ये उघड होणे आवश्यक असेल . तर यासंदर्भातील खात्री पटल्यानंतर विलंब क्षमापित केला जाईल .

सदरची रजा कोणत्याही विकलांगतेच्या बाबतीत 24 महिन्यांपेक्षा अधिक असून नये , सदरची विशेष विकलांगता रजा ही रजेस जोडून घेता येते . सदर विकलांगता पुन्हा उद्भवल्यास पुन्हा 24 महिने कालावधीकरीता घेता येते .

विशेष विकलांगता रजा कालावधी मधील वेतन : प्रथम 120 दिवस हे अर्जित रजा वेतन इतके उर्वरित कालावधीसाठी अर्धवेतन रजा वेतनाइतके वेतन आहारित करण्यात येते . जर कर्मचाऱ्यांच्या इच्छा असल्यास प्रथम 120 दिवसानंतर आणखी 120 दिवसाकरीता अर्जित रजा वेतन वेतन घेवू शकतील .

रुग्णालयीन रजा : सदरची रजा ही संवर्ग 4 मधील कर्मचारी तसेच घातक यंत्रसामुग्री ,विषारी द्रव्ये , स्फोटक ठिकाणे / धोक्याच्या ठिकाणी कार्यरत अशा वर्ग 3 कर्मचाऱ्यांनाच अशा प्रकारची रजा अनुज्ञेय होते . तसेच पोलिस अधिकारी ( ज्यांमध्ये हवालदार पेक्षा अधिक दर्जाचे नसणारे प्रशिक्षणार्थी ) तसेच राज्य उत्पादन शुल्क मधील लिपिक संवर्गीय कर्मचारी सोडून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना या प्रकारची रजा अनुज्ञेय होते  .सदरची रजा ही वरील नमुद कर्मचाऱ्यांस जास्तीत जास्त 28 महिने कालावधीसाठी मंजूर करता येते .

रजा कालावधी मधील वेतन : सदर रुग्णालयीन रजा कालावधी मध्ये कर्मचाऱ्यांस पहिल्या 120 दिवसाकरीता अर्जित रजा प्रमाणे वेतन तर उर्वरित कालावधीकरीता अर्धवेतन रजा प्रमाणे वेतन आहरीत करण्यात येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment