लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांना विलंबाने प्रदान करण्यात येणारे देयके व्याजासह प्रदान करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर देयके काही विशिष्ट प्रकरणांमध्येच देय करण्यात येत आहेत , कोणकोणत्या प्रकरणांमध्ये विलंबाने प्रदाने होणारे देयके व्याजासह प्रदान करण्यात येईल ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
वेतननिश्चिती : महाराष्ट्र नागरी सेवा , सुधारित वेतन नियमांनुसार वेतन थकबाकी अदा करण्या संबंधीचे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांका नंतर ज्यांच्या सेवा समाप्त झाल्या असतील त्यांच्या बाबत त्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीनंतर न्याय रक्कम अदा करण्यात आली त्यांच्या सेवा समाप्त होतील त्या दिनांकापासून सहा महिन्यांनंतरच्या कालावधी करीता व सदर रक्कम अदा करण्यात आली असेल त्या महिन्यांच्या आधीच्या महिन्यापर्यंत व्याज अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .परंतु शासनाचे वेतन पुनर्रचनेमुळे येणारा वेतनाची थकबाकी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्याचे आदेश आहेत .
पदोन्नती / मानिव दिनांक किंवा वेतन पुर्नरचनेनंतर वेतनश्रेणीची पुर्नसुधारणा इ.मुळे होणारी वेतननिश्चिती : पदोन्नती किंवा वेतनपुर्नरचनेनंतर वेतश्रेणीची पुर्नसुधारणा या संबंधीचे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून किंवा मानिव दिनांक देण्यास शासनाने मान्यता दिल्या संबंधिचे आदेश / सुचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यानंतर त्या संबंधीची थकबाकी अदा करण्यात आली असल्यास संबंधित आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यानंतरच्या काहलावधीकरीता व सदर रक्कम अदा करण्यास आली असेल त्या महिन्यांच्या आधीच्या महिन्या पर्यंत व्याज अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
वेतनवाढी , आगाऊ वेतनवाढ व महागाई भत्ता वाढ , प्रवास भत्ता इ. मुळे मिळणाऱ्या रकमा : या बाबींबातचे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यानंतर थकबाकी अदा करण्यात आली असल्यास संबंधित आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यां नंतरच्या कालावधीकरीता व्याज प्रदान करण्याचे आदेश आहेत .यांमध्ये प्रवास भत्ता देयकाबाबत , संबधित शासकीय कर्मचाऱ्याने आपले प्रवास भत्त्याचे देयके सादर केल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीनंतर त्या बाबतची रक्कम अदा करण्यात आली असल्यास देयके सादर करण्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांनंतरच्या कालावधीकरीता व सदर रक्कम अदा करण्यात आली असेल त्या महिन्यांच्या आधीच्या महिन्यापर्यात व्याज अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
या संबंधी राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.22.11.1994 मध्ये निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !