Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee karyamulyamapan Ahaval ] : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील गट अ व गट ब ( राजपत्रित अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहीण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करणेबाबत , राज्य शासनांच्या नगर विकास विभागांकडून दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल लिहीणे व जतन करणे याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक 01 नोव्हेंबर 2011 नुसार एकत्रित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत , तर दिनांक 07.02.2018 नुसार कार्यमुल्यमापन अहवालाचा सुधारित नमुना निश्चित करण्यात आलेला असून , सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 24.02.2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर नगर विकास विभागाच्या दिनांक 25.01.2023 रोजीच्या अधिसूचनेनुसार ,

मुख्याधिकारी गट अ आणि गट ब ( राजपत्रित ) या संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यमापन अहावाल महापार प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने लिहीण्याकरीता सविस्तर सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . त्यानुसार सदर विभाग अंतर्गत महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेत कार्यरत सर्व अधिकाऱ्यांचा महापार प्रणालीत समावेश करण्यात आला असून सन 2022-23 या प्रतिवेतन वर्षापासूनचे कार्यमुल्यमापन अहवाल महापार या प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे .  

महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा मधील गट अ व गट ब ( राजपत्रित ) अधिकाऱ्यांचे गोपनिय अहवाल लिहीणे व पुनर्विलोकित करणे याबाबत सदर विभागाच्या दिनांक 12.02.1986 च्या परिपत्रकानुसार कार्यपद्धती विहीत करण्यात आलेली होती . दिनांक 25 जानेवारी 2023 नुसार महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा 2023 अधिसूचित करण्यात आलेली आहेत , त्यानुसार महाराष्ट्र शहरी प्रशसकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा पद संरचनेत व पदनामात बदल झालेला असून सदर सेवेत वरिष्ठ वेतनश्रेणीची पदे निर्माण करण्यात आलेली आहेत .

महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा मधील अधिकाऱ्यांचे गोपनिय अहवाल लिहीण्याबाबतची कार्यपद्धती सन 2023-24 या वर्षांपासून अंमलात येणार आहेत . या संदर्भात नगर विकास विभागांकडून दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *