Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मोठे आर्थिक त्याचबरोबर सेवाविषयक लाभ मिळणार आहेत . यामुळे राज्यातील शासकीय -निमशासकीय , अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुन महिना खुप लाभदायक ठरणाार आहे .

सातवा वेतन आयोग थकबाकी फरकाचा चौथा व उर्वरित हप्ते मिळणार – राज्यातील सर्व शासकीय – निमशासकीय ( जिल्हा परीषदा ) कर्मचारी तसेच अनुदानित शाळेतील पात्र शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता अदा करण्याचे वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला , दुसरा व तिसरा हप्ता अद्याप प्राप्त झालेला नाही , अशा कर्मचाऱ्यांना पहिला , दुसरा व तिसरा हप्ता अदा करण्यासाठी निधींची उपलब्ध करुन जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत उर्वरित सर्व हप्ते अदा करण्याची विनंती कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलेली आहे . अन्यथा पुढील जुलै महिन्यांत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे .

वाढीव महागाई भत्त्याचा मिळणार लाभ : राज्यातील विधी व न्यायिक विभागातील अधिकाऱ्यांना त्याचबरोबर , राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे . तर राज्यातील इतर सर्व शासकीय कर्मचारी / पेन्शनधारकांना जुन वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव 4 टक्के डी.ए चा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या सन 2023-24 मधील सर्वसाधारण बदल्या बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !

जुनी पेन्शन योजना : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून गठित समितीस राष्ट्रीय पेन्शन योजना व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन राज्य कर्मचाऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शन लागु करणेबाबत अभ्यास समितीस अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आलेला आहे . हा अवधी दि.14 जुन 2023 रोजी संपणार असल्याने , पेन्शन योजनेबाबत मोठा निर्णय जुन महिन्यांत होईल .

आपण जर शासकीय , निमशासकीय , शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *