Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जुन महिना वरदान ठरणार आहे . जुनी महिन्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना मोठे आर्थिक व सेवाविषयक लाभ मिळणार आहेत . यामध्ये पेन्शनसह , डी.ए वाढ , व इतर वेतनविषयक लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहेत .

सातव्या वेतन आयोग थकबाकीचा चौथा हप्ता : राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) , इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग थकबाकीचा चौथा हप्ता जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत रोखीने अदा करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

महागाई भत्ता 4 टक्के वाढ : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी 2023 पासून आणखीण चार टक्के डी.ए वाढ करण्यात येणार आहे . राज्यातील आखिल भारतीय सेवेतील व न्यायिक अधिकाऱ्यांना जानेवारी 2023 पासून डी.ए फरकासह मे महिन्यांच्या वेतनासोबत अदा करण्याचे शासन निर्णय राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत , आता राज्यातील सर्व सरकारी – निमसरकारी कर्मचारी , पेन्शनधारक यांना चार टक्के डी.ए वाढ करणेबाबत जुन महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे , अशी सुत्रांकडून खात्रीलायक बातमी समोर येत आहे .

हे पण वाचा : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे आवश्यक , जाणून घ्या शासनाची तरतूद !

जुनी पेन्शन योजना : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ अनुज्ञेय करणेबाबत राज्य शासनांकडून समिती गठीत करण्यात आलेली होती , या समितीने NPS  व जुनी पेन्शन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करुन आपला अहवाल राज्य शासनांकडून सोपविण्यात आले आहे . या अहवालावर राज्य शासनांकडून लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार आहे . राज्य शासनांस पेन्शन लाभ करणेबाबत तीन महिन्यांचा अवधी दिल्याने , तीन महिने कालावधी 14 जुन ला होत असल्याने , जुन महिन्यातच पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय होईल .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुन महिना हा वरदान ठरणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *