लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणारे पाचवा / सहावा / सातवा वेतन आयोगानुसार वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचे दर सुधारित करण्यात आलेले आहेत .सदर महागाई भत्ताचे सुधारित दर जानेवारी 2023 पासून लागु करण्यात आलेले असून , जुन 2023 च्या वेतन देयकासोबत रोखीन अदा करण्याचे वित्त विभागांकडून आदेश देण्यात आलेले आहेत .
परंतु 4 टक्के डी.ए वाढ करणेबाबतचा निर्णय हा दिनांक 30.06.2023 रोजी म्हणजेच महिना अखेर झाला आहे , यामुळे काही कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन बिल तयार करण्यात आलेले आहेत , यामुळे ज्यांचे वेतन बिल तयार करण्यात आलेले आहेत , अशा कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए पुढील महिन्यांत म्हणजेच जुलै महिन्यात डी.ए फरकासह अदा करण्यात यावेत असे कोषागार कार्यालयांकडून सुचित करण्यात आले आहेत .
ज्याचं वेतन बिल तयार करण्यात आलेले नाहीत , अशा सर्वांना जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत , वाढीव 4 टक्के डी.ए व महागाई भत्ता फरक रोखीने अदा करण्याचे निर्देश वित्त विभागाच्या शासन निर्णयांन्वये देण्यात आलेले आहेत . शिवाय माहे जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत सातवा वेतन आयोगाचा 4 था हप्ता अदा करण्याचे निर्देश वित्त विभागांकडून देण्यात आलेले आहेत .
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुन महिन्यांच्या वेतनासोबत डी.ए वाढीस सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता मिळणार असल्याने पगारांमध्ये मोठी वाढ होणार आहे , NPS धारक कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगाचा 4 था हप्ता हा रोखीन तर GPF धारकांना भविष्य निर्वाह निधी योजनांमध्ये जमा करण्याचे निर्देश वित्त विभागांकडून देण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसचे सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !