राज्यातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे माहे जून महिन्याच्या वेतनात कपात करणे बाबत , शासन निर्णय निर्गमित !GR दि.09.06.2023

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्यातील सर्व भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी , त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या माहे जून 2023 च्या वेतनामध्ये कपात करणे संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 9 जून 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरिता राज्य शासनाकडून मदत कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून , या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य आणि मदत व पुनर्वसनाच्या कामास हातभार लागावा म्हणून , राज्यातील सर्व भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी, त्याचबरोबर भारतीय प्रशासन सेवेतील पोलिस अधिकारी त्याचबरोबर ,राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्य बुद्धीने त्यांना माहे जून 2023 च्या वेतनातील प्रत्येकी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्य निधीमध्ये देण्याबाबत आव्हान करण्यात येत आहे .

राज्य शासनातील सर्व मंत्रालय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय , निमशासकीय कार्यालय / जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,महानगरपालिका, नगरपालिका / नगरपरिषद, सार्वजनिक उपक्रम , महामंडळे तसेच सर्व स्वायत्त्य संस्थेचे विभाग प्रमुख/ कार्यालय प्रमुख यांनी सदर शासन परिपत्रक आपल्या विभागातील/ कार्यालयातील सर्व अधिकारी /कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावेत . व त्यांना याबाबत समजावून सांगावे तसेच एक दिवसाची वेतन कपाची त्यांची अनुमती या शासन निर्णयामध्ये विहित अनुमती पत्रात स्वाक्षांकित करून विभागातील/ कार्यालयातील रोख कार्यासन व रोखपाल यांच्याकडे सुपूर्त करण्याचे सूचित करण्यात आले आहेत.

वेतन कपात शासन निर्णय पाहा

सध्या ज्या अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन त्यांनी शासनास उपलब्ध करून दिलेल्या त्यांच्या बँक खात्यात तपशील नुसार खात्यावर परस्पर जमा करण्यात येते , अशा अधिकारी /कर्मचारी यांच्या वेतनातील नियमित वजावतीनंतर उर्वरित वेतनाची रक्कम संबंधित बँकेकडे जमा करण्यापूर्वी सदर रकमेतून जून 2023 मधील वेतनातून एक दिवसाचे वेतन कमी करून शिल्लक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे .

एक दिवसाचे वेतन कपात करत असताना मूळ वेतन अधिक महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करून कपात करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे . सदर वेतन कपात संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 9 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Comment