Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व सरकारी निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग थकबाकीचे हप्ते प्रदान करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अखेर दि.24 मे 2024 रोजी शासन निर्णय ( GR )  निर्गमित करण्यात आलेला आहे , सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात ..

वरील नमुद सर्व पात्र शासकीय – निमशासकीय व इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचा चौथा हप्ता हा माहे जुन 2023 च्या वेतन व देयकासोबत अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत , भविष्य निर्वाह निधी योजनेतील कर्मचाऱ्यांना GPF खात्यात थकबाकी अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर , NPS खारक कर्मचाऱ्यांना जुन वेतनासोबत , रोखीन थकबाकी अदा करण्यात येणार आहेत . त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना थकबाकीचा चौथा हप्ता जून महिन्यांच्या निवृत्तीवेतनासोबत अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

जे कर्मचारी ( GPF योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह ) दिनांक 01 जून 2022 ते सदर शासन आदेशांच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यु पावले असतील , अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या उर्वरित हप्त्यांची रक्कम रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . तसेच कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्यांच्या रकमेवर शासन परिपत्रक दिनांक 20.02.2019 मधील तरतुदीनुसार दि.07.07.2022 पासून व्याज अनुज्ञेय असणार आहेत .

हे पण वाचा : जून महिन्यापासून राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार ?

तसेच भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम दि.20 फेब्रूवारी 2019  मधील परिच्छेद क्र.14 मधील तरतुदी प्रमाणे काढता येणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.24 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला थकबाकी प्रदानाचा GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

आपण जर शासकीय , निमशासकीय , शिक्षक -शिक्षकेत्तर व पेन्शनधारक कर्मचारी असाल तर खालील Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *