लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत , वाढीव चार टक्के डी.ए लागु करणेबाबत वित्त विभागांकडून शासन निर्णय हा जुन महिना अखेर दिनांक 30 जुन रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णय हा खुपच विलंबाने निर्गमित झाला आहे .
बऱ्याच विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन बील तयार करण्यात आलेले होते , यामुळे सदर कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए चा लाभ हा पुढील महिन्यांच्या वेतन देयकासोबत घ्यावा असे कोषागार कार्यालयांकडून निर्देश देण्यात आलेले आहेत . शिवाय कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणाली / वेतन बिल प्रणाली मध्ये 42 टक्के डी.ए अद्यावत होत नसल्याने , कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु होवून देखिल वाढीव चार टक्केचा लाभ पुढील महिन्यात घ्यावा लागणार आहे .
म्हणजेच वाढीव चार टक्के डी.ए व माहे जानेवारी ते जून महिन्यांतील डी.ए थकबाकीचा लाभ माहे जुलै महिन्यांच्या वेतन देयकासोबत मिळणार आहे .पेन्शनधारकांना देखिल पुढील महिन्यांत वाढीव डी.ए व डी.ए फरकाचा लाभ पेन्शनसोबत देय करण्यात येणार आहेत .
जुलै महिन्यात होणार दुहेरी फायदा : माहे जुलै महीन्यात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ ( Yearly Payment Vadh ) लागु करण्यात येते . यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांत बाकी असणार डी.ए फरक , व वाढीव वेतन असा एकत्र दुहेरी फायदा होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !
- विधानसभा सार्वत्रिक निवडणुका बाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित !
- माहे डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणारं हे मोठे आर्थिक लाभ ; जाणून घ्या सविस्तर !
- मतदान केंद्रावर मतदान कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळणार ह्या सुविधा !