कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै 2023 च्या वेतनाबाबत अत्यंत महत्वपुर्ण सुचना निर्गमित , शासन परिपत्रक दि.17.07.2023

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे जुलै 2023 च्या वेतन देयकासंदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले असून , देयके अदा करणेसंदर्भात काही सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .

माहे जुलै 2023 चे देयके सादर करताना देयकांसोबत चेंज स्टेटमेंट ( तफावतीचे ) ची एक प्रत अटॅच करावी , शेवटच्या संचमान्यतेसह सुधारित खाते मान्यता आदेश जोडावेत तसेच आर्थिक व प्रशासकीय अधिकार असल्याशिवाय देयके Forward करु नयेत , Forward केल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यास येईल याचीही नोद घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत .

तसेच देयके फॉरवर्ड केल्याची प्रत देयकासोबत पेज क्र.01 जोडावेत , तसेच वेतन देयक सादर करण्यासाठी मुख्याध्यापक अथवा संबंधित लिपिक अथवा मुख्याध्यापक यांनी प्राधिकृत केलेला कर्मचारी यांनी प्राधिकृत पत्रासह दयके सादर करावीत त्रयस्थ कर्मचाऱ्यांकडून देयके स्विकारण्यात येणार नाही अशा स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहेत .सदच्या सुचना ही फक्त नियमित वेतन देयकासाठीच असून , सदर वेळापत्रका दरम्यान कोणतेही थकीत देयके स्विकारण्यात येणार नाही , तसेच कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत कुणीही थकीत देयके कार्यालयास सादर करु नयेत अशा स्पष्ट सुचना देण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन साठी शाळा लॉग ईन नियमित वेतनश्रेणी दिनांक टाकुन चेंज डिटेल्स पे युनिट लॉग ईनवर सेंड करावेत . व प्रथम आदेश व मा.शिक्षणाधिकारी यांचे वैयक्तिक मान्यता आदेशाच्या प्रतीची फाईल सादर करावी .तसेच निवड श्रेणी , वरिष्ठ श्रेणी व अन्य देयकांचे थकबाकी ऑनलाईन काढू नये असे आदेश देण्यात आलेले आहेत .

सविस्तर परिपत्रक पाहा

नव्याने 20 टक्के अनुदानावर आलेल्य शाळा / क.म.वि यांचे शाळज्ञ ऑनलाईन करणे , संचमान्य अपलोड करणे व कर्मचारी अप्रुव्ह करो बाबतचे कामाची कालमर्यादा दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत होती . दिनांक 17 ते 19 जुलै 2023 रोजी फक्त नियमित वेतन दयके स्विकारावयाची असल्यने सदर नविन 20 टक्के अनुदानित शाळा / क.म. वि. यांनी उपरोक्त कामासाठी कार्यालयातन येण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .

तसेच ज्या कर्मचाऱ्यांना जुलै मध्ये वार्षिक वेतनवाढ देय आहे , अशी वेतनवाढ देय असलेल्या कर्मचाऱ्यांची जुलै 2023 ची वार्षिक वेतनवाढ ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये लागु करुन फॉरवर्ड करावेत , ज्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी मध्ये वार्षिक वेतनवाढ ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये लागु करुन फॉरवर्ड करावेत तसेच ज्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी मध्ये वार्षिक वेतनवाढ देय ठरते त्यांना जुलै मध्ये वार्षिक वेतनवाढ लागु करु नयेत असे स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहेत .

माहे जुलै वेतन देयके अदा करणे संदर्भात निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन परिपत्रक

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक , कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment