Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee July month payment update news ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै पेड ऑगस्ट महिन्यांच्या वेतनासोबत तीन मोठे महत्वपुर्ण लाभ मिळणार आहेत , याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

महागाई भत्ता वाढ : राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना माहे जानेवारी 2024 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेला असून , सदर डी.ए वाढ जुलैच्या वेतन / निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार असून , सदर वेतनासोबत माहे जानेवारी ते जुन कालावधीमधील डी.ए फरकाची रक्कम देखिल अदा करण्यात येणार आहे .

जुलै वेतनवाढ ( Early increament ) : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागु करण्यात येते  , यामुळे कर्मचाऱ्यांना जुलै पेड जुलै वेतनांत मुळ वेतनातील वाढीमुळे इतर देय वेतन / भत्ते मध्ये देखिल वाढ होणार आहेत . मुळ वेतनातील वाढीमुळे घरभाडे भत्ता , प्रोत्साहन भत्ता इ. भत्ता मध्ये वाढ होते .

सातवा वेतन आयोगाचा 5 वा हप्ता : सातवा वेतन आयोग फरकाचे एकुण 5 हप्त्यांमध्ये रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यात नियोजित होते , यानुसार सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जुलै पेड ऑगस्ट वेतनांसोबत तर जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत , अशांना रोखीने अदा करण्याचे निर्देश वित्त विभागांकडून देण्यात आलेले आहेत .

यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै पेड ऑगस्ट वेतन / पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *