Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee January Paid In February Payment Anudan Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2024 साठी अनुदान वितरण करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण , महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती . यानुसार राज्य शासनांकडून लेखाशिर्ष निहाय , नियंत्रक अधिकारीसर वितरीत करण्यात आलेले अनुदान शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . सदर लेखाशिर्ष निहाय अनुदान पुढीलप्रमाणे पाहु शकता .

सदरचा निधी खर्च करीत असताना , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय / परिपत्रक यांमधील विहीत सूचना / अटी त्याचबरोबर वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट – 26 मधील तरतुदी विचारात घेवून संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रक्कमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत  .

त्याचबरोबर थकित देयकांचे प्रदान करण्यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या प्रकरणी खरेदी साहित्य प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे व त्यचे लेखे सुयोग्यरित्या ठेवल्याची खात्री पटल्याशिवाय सदरचा निधी आहरित करण्यात येवू नयेत अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .

या संदर्भातील राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *