Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee January paid in fab month payment update ] : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शाळाचे वेतन देयके ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बाबत शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जानेवारी पेड इन फेब्रुवारी महिन्याचे वेतन देयके सादर करणेबाबत वेळापत्रक सादर करण्यात आलेला आहे .

सदरच्या वेळापत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , डीडीओ – 01 यांनी डीडीओ – 2 कडे देयके फॉरवर्ड करण्याचा नियोजित कालावधी हा दिनांक 16.01.2025 असा असणार आहे . तर हायस्कूल मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती स.ले.अ.यांनी सादर करण्याचा अंतिम कालावधी हा दिनांक 17 जानेवारी 2025 असणार आहे .

तर डीडीओ – 02 ने शालार्थ प्रणालीमधून देयके डीडीओ – 3 कडे फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक हा 21 जानेवारी 2025 इतका असणार असून हायस्कूल मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग ( प्राथमिक ) येथे सादर करण्याचा अंतिम दिनांक हा दिनांक 22 जानेवारी 2025 इतका असणार आहे .

सदरचे वेतन देयके सादर करताना ज्यांना प्रान नंबर प्राप्त झालेले आहेत , अशांचे माहे जानेवारी 2025 च्या वेतनातुन एनपीएस रक्कम कपात करण्यात यावी , तर जे कर्मचारी चालु महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत , अशा कर्मचाऱ्यांचे एनपीएस वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येवू नयेत असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच सन 2024-25 करीता लागणारा एकुण आयकर रकमेपैकी कमीत कमी 50 टक्के रक्कम ही माहे जानेवारी 2025 च्या वेतनामध्ये शालार्थ प्रणालीमूधन आयकर चे टॅब मध्ये करण्यात यावेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *