Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee January Month Payment & Pay Commission 3 & 4th Installment ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे सन 2023-24 या आर्थिक वर्षातील जानेवारी , 2024 या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्तीवेतन तसेच इतर थकित देयके , वैद्यकीय देयके अदा करणेबाबत राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

माहे जानेवारी 2024 या महिन्यातील वेतन व भत्ते तसेच निवृत्तीवेतन सन 2023-24 या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी 2024 या ज्ञापनाद्वारे लेखाशिर्ष 222020173/36 मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली तरतुद फक्त सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व चौथा हप्ता त्याचबरोबर वैद्यकीय देयके व थकित देयके अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच लेखाशिर्ष 22020173/04 या लेखाशिर्ष मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली रक्कम ही सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता व अंशराशीकरण , उपदानासाठी अदा करावयाचा आहे . तसेच सदर परिपत्रकानुसार , सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या ज्येष्ठतेनुसार , ( जे शिक्षक आधी निवृत्त झालेले आहेत ) त्यांना प्राधान्य क्रमाने चौथा हप्ता व अंशराशीकरण , उपदान तरतुद अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदरचा निधी ज्या उद्देशासाठी मंजुर करण्यात आलेला आहे , त्याच उद्देशासाठी मंजूर करण्याचे निर्देश आहेत , तसेच सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार , संबधित अधिकाऱ्यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकास दरमहा 10 तारेखपर्यंत सादर करण्याचे निर्देश आहेत . त्याचबरोबर खर्च मेळावा त्रेमासिक अहवाल विहीत प्रपत्रात नियमितपणे सादर करण्याचे निर्देश आहेत .

जिल्हा निहाय व लेखाशिर्ष निहाय यापुर्वी वितरीत करण्यात आलेली तरतुद , व सदर ज्ञापनानुसार वितरीत करण्यात आलेली तरतुद या संदर्भात जिल्हा निहाय सविस्तर तरतुद पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

शासन परिपत्रक

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *