Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Yearly Increament Rules ] : वेतनवाढीची सेवा ग्राह्य धरताना सामान्यत : मागील 12 महिन्याचा कालावधीमध्ये ग्राह्य धरण्यात येतो . तर द्वेवार्षिक वेतनवाढीमध्ये तो 02 वर्ष इतक्या कालावधीचा असतो . या संदर्भातील सविस्तर वेतनवाढीचे नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..
वेतनवाढीकरीता कर्तव्यकाळ म्हणजे दैनंदिन कामकाजाचा भाग , वेतन देय अशी सर्व प्रकारची रजा व विशेष रजा , परिविक्षा कालावधी ग्राह्य धरण्यात येतो . यांमध्ये परिवीक्षाधीन कालावधी एक वर्षांपेक्षा अधिक असेल तर प्रथम वेतनवाढ ही विनावेतन रजा असल्या प्रकरणी वगळून नियत तारखेस अनुज्ञेय असेल . दिनांक 01 जानेवारी 2006 पासून वेतनवाढीच्या संकल्पनामध्ये शासनाने बदल केल्याने दिनांक 01 जुलै रोजी जर त्या कर्मचाऱ्याने सहा महिने सेवा पूर्ण केली असल्यास त्यावेळी त्या 01 जुलैस प्रथम वेतनवाढ देय असेल .
म्हणजेच दिनांक 01 जुलै ते दिनांक 01 जानेवारी या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 01 जुलै ची पहिली वेतनवाढ देय असेल परंतु ज्यांनी नेमणूक दिनांक 02 जानेवारी ते दिनांक 30 जून या कालावधीमध्ये , झालेली असेल अशांना पहिली वेतनवाढ ही येणाऱ्या 01 जुलैस न देता पुढील दिनांक 01 जुलैस देय असेल . या संदर्भात राज्य शासनांकडून दिनांक 26 डिसेंबर 2011 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
परिविक्षाधीन कालावधी समानधारक पुर्ण केल्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर दुसरी वेतनवाढ देय असेल . तर परिविक्षाधीन कालावधी असमानधारक असल्यास , सदर कालावधी हा पुढे ढकलला जाईल . तर ज्या वेळी परिविक्षाधिन कालावधी हा समानधारक होईल त्या वेळी दुसरी वेतनवाढ लागु करण्यात येईल.
वैद्यकीय कारणाकरीता घेण्यात आलेल्या असाधारण रजा वेतनवाढीकरीता ग्राह्य धरता येतात , परंतु वैद्यकीय व्यतिरिक्त घेण्यात आलेल्या असाधारण रजेमुळे ( विनावेतन ) तो कालावधी वगळून वेतनवाढीची गणना करण्यात येईल .त्याचबरोबर प्रशिक्षण अथवा प्रतिनियुक्तीवरील काळही वेतन वाढीसाठी ग्राह्य धरला जाईल . पदग्रहण कालावधी हा वेतनवाढीकरीता ग्राह्य धरला जाईल .
वरिष्ठ पदावर कार्यरत असताना , ज्या कनिष्ठ पदावर तो कायम राहील त्या पदावरील वतेन वाढीकरीता वरिष्ठ पदावरील सेवा ग्राह्य धरता येते . तसेच संवर्गबाह्य कालावधी हा वेतनवाढीकरीता ग्राह्य धरण्यात येईल . तसेच निलंबनाचा कालावधी हा निलंबन म्हणून गाला गेल्यास तो वेतनवाढीकरीता ग्राह्य धरला जाईल . वेतनवाढीचा दिनांक हा दिनांक 01 जानेवारी 2006 पासून बदलण्यात आलेला आहे , त्यापासून पुढे सर्वांना सरसकट दिनांक 01 जुलै रोजी वेतनवाढ देय असेल व त्याचा दर 3 टक्के इतका असणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.