लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय व परिपत्रके बाबत संकलन पुस्तिका विनायक महामुणकर सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी पोलिस आयुक्त , बृहन्मुंबई कार्यालय यांनी तयार करण्यात करण्यात आलेली आहे , सदर संकलन पुस्तिका राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण पुस्तिका आहे .
सदर संकलन पुस्तिकांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते , वेतनवाढ , वेतननिश्चिती इ. बाबी संदर्भात सविस्तर माहीती विशद करण्यात आलेली आहे . यांमध्ये वेतनवाढ रोखून धरणे , पदोन्नतीच्यावेळी वेतननिश्चिती करीता विकल्प , गुन्हा अन्वेषण विभागातील कर्मचाऱ्यांना गुणवेश भत्ता , परिविक्षाधीन कर्मचाऱ्यांचे परिवीक्षावधीतील व त्यानंतरच्या स्थानापन्न नियुक्तीनंतर वेतन निश्चिती यासंदर्भात सुधारित परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
तसेच सुधारित वेतनश्रेणींच्या कमाल वेतनावर कुंठित झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना कमाल वेतनोत्तर वेतनवाढी मंजुर करणे , तसेच एका पदावरुन दुसऱ्या नविन पदावर नियुक्ती होत असताना त्या पदावरील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पहिल्या पदापेक्षा अधिक नसतील तेव्हा करावयाची वेतननिश्चिती व त्यासाठी द्यावयाचा विकल्प विशद करण्यात आलेले आहेत .
सविस्तर संकलन पुस्तिका डाऊनलोड करा
तसेच रोख रक्कम हाताळण्याबद्दल विशेष वेतन मंजुर करणे , राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना स्थानिक पुरक भत्ता व घरभाडे भत्ता रजेच्या कालावधीत आहरित करणेबाबत वित्त विभागाचे सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .तसेच वित्त विभागांकडून अंध अस्थिव्यंगाने अधू आणि कण्याच्या विकाराने पिडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता मंजूर करण्याबाबतच्या सुधारित तरतुदी नमुद करण्यात आलेल्या आहेत .
तसेच निलंबित कर्मचाऱ्यांच्या निर्वाह भत्त्याची परिगणना करताना मुळ वेतनांमध्ये 50 टक्के महागाई भत्ता ( Dearness Pay ) विलिन करणेबाबत वित्त विभागांकडून सुधारित शासन निर्णय दिनांक .26.06.2006 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे , तसेच पुस्तिकांमध्ये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( कालबद्ध पदोन्नती इ.बाबतीत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सविस्तर पुस्तिका ( PDF ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
शासन निर्णय / परिपत्रके संकलन पुस्तिका
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !