Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना , 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दिनांक 01 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीकरीता बाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर शासन निर्णयान्वये राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत दि.01.01.2024 ते दिनांक 31.12.2024 या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्याकरीता परिगणितीय तक्ते सदर शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेले आहेत . सदर निर्णयामध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिट करीता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , मंत्रालयातील सर्व विभाग त्याचबरोबर मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांनी दिनांक 01.01.2024 पासून राजीनामा , सेवानिवृतती अथवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदर निर्णयासोबत जोडलेल्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
गट विमा योजनपा 1982 च्या परिच्छेद 8.4 नुसार निधीमधील शिल्लक रकमांवर दरसाल विहीत दराने तिमाही चक्रवाढ होणारे व्याज देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे . राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 च्या बचत निधीमधील संचित रकमांवर दिनांक 01 जानेवारी 2024 पासून दर साल दर शेकड 7.1 टक्के दराने तिमाही चक्रवाढ होणारे व्याज आकरण्यात येईल . राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा 4 टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये कर्मचाऱ्यांचा मृत्यु सेवानिवृत्ती , राजीनामा इत्यादी कारणांमुळे दिनांक 01 जानेवारी ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीत गटविमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या रुपये 60 /- प्रमाणे अंशदान करणाऱ्या सदस्यांच्या बचत खात्यांमध्ये संचित होणारी बचत निधीची व्याजासह एकुण देय होणारी रक्कम दर्शविणारा सविस्तर तक्ता व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.