Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay dated 29 july about pramotion ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 29 जुलै 2024 रोजी सामान्य प्रशासन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयांनुसार अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे .
राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी / कर्मचारी यांना गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंतच्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के या प्रमाणात आरक्षण दिनांक 30 जुन 2016 पासून लागु करण्यात येत आहेत . सदर आरक्षण हे पुर्वलक्षी प्रभावाने लागु करताना पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिनांक 20 एप्रिल 2023 रोजीच्या निर्णयात निमुद केलेल्या पात्रता अटींच्या पुर्ततेच्या अधीन राहून दिनांक 30 जुन 2016 पासून काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच दिनांक 30 जुन 2016 पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी / कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासन त्यांना काल्पनिक रित्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा , असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच पदोन्नतीचा प्रत्यक्षात आर्थकि लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारेखपासून लागु होईल , असे नमुद करण्यात आले आहेत .
विभागीय परीक्षा / विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने होणाऱ्या पदोन्नतीसह , इतर प्रचलित मार्गांनी झालेल्या पदोन्नती प्रक्रियांमध्ये दिव्यांगांना काल्पनिक पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा , असे नमुद करण्यात आले आहेत . सदर आदेशात राज्य शासकीय / निमशासकीय सेवा , शासनाचे उपक्रम , सर्व शासकीय मंडळे , प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्था , जिल्हा परिषदा , महानगरपालिका , नगरपालिका , शासन अनुदानित संस्था व ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनास आहेत अशा सर्व संस्था व सेवा यांना लागु असणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.