Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay dated 29.11.2024 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार , अतिप्रदान रकमेच्या वसुलीबाबत जबाबदारी निश्चत करणे , तसेच वेतन अनुदान वितरीत करणेबाबत व राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

अतिप्रदान रकमेच्या वसुलीबाबत : वचनपत्र न घेतल्यामुळे अतिप्रदान रकमेच्या वसुलीबाबत जबाबदारी निश्चित करण्या संदर्भात मार्गदर्शक सुचना देणे संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत दि.29.11.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार , वित्त विभाग दि.22 नोव्हेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकातील सुचनांप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी सदरचे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 03 महिन्यांच्या आतमध्ये वचनपत्र भरुन घेणे आवश्यक असणार आहेत . ज्या कर्मचाऱ्यांनी सदरचे वचनपत्र भरुन दिले नाहीत , त्यांचे विहीत कालावधीनंतरचे वेतन रोखण्याची कार्यवाही संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी करावी , असे नमुद करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी कुठल्याही कर्मचाऱ्यांची नव्यावे वेतननिश्चिती करताना / वेतननिश्चिती सुधारित करतांना ती अचूक होईल , याची दक्षता घेण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत . तर चुकीची वेतननिश्चिती केल्याने तसेच अतिप्रदान रक्कम वसुल न झाल्यास सदर बाबतीत चुकीची वेतन निश्चिती करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सदरची अतिप्रदानाची रक्कम वसूल करण्यात यावी असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच चुकीच्या वेतन निश्चितीमुळे अतिप्रदान झाल्याची बाब निदर्शनास आल्यास , त्याची जबाबदारी वेतन निश्चिती बाबत कार्यवाही करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर निश्चित करण्यात यावी असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय / व इतर दोन शासन निर्णय पाहण्यासाठी Click Here

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *