Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment Anudan Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन करीता अनुदान वितरण करणे संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 12 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अर्थसंकल्पीत वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रिडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सह सचिव / उप सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग , मंत्रालय मुबई यांना वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .

यानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अनिधनस्त ठैवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहेत .

लेखाशिर्ष निहाय वितरीत करण्यात आलेले अनुदान व नियंत्रक अधिकारी याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाण आहे ..

सदरचा निधी हा सन 2023-24 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेल्या वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय / शासन परिपत्रक यामधील विहीत सुचना व अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट – 26 मधील तरतुदी विचारात घेवून संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रक्कमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच सदरचा निधी वितरीत करताना वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील शालेय शिक्षण व‍ क्रिडा विभागांकडून दिनांक 12 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *