Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay dated 08 October ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 08 ऑक्टोंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण् 04 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यांमध्ये वेतन , सण अग्रिम तसेच निवृत्तीवेतन करीता अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहेत .
वेतन / भत्ते अदा करण्यासाठी निधीचे वितरण : राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन तसेच भत्त्यासाठी सन 2024-25 या वर्षाकरीता अर्थसंकल्पिय तरतुदीमधून निधीचे वितरण करणेबाबत , सा.प्र.विभागांकडून दि.08.10.2024 रोजी वित्त विभागाच्या दिनांक 12.01.2023 रोजीच्या संदर्भिय निर्णयानुसार , सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
सण अग्रिम वाढबाबत : राज्यातील कोतवालांना महत्वाच्या सणानिमित्त देण्यात येणाऱ्या सण अग्रिमांच्या रक्कमेत वाढ करुन रुपये 2000/- ऐवजी 10,000/- रुपये इतके सण अग्रिम प्रत्येक कोतवालास देण्यास मंजूरी देण्यात आली आहे . सदर सण अग्रिम हे दिवाळी , रमझान ईद , ख्रिसमस , पारसी नववर्ष , संवत्सरी , रोश – होशना , वैशाखी पौर्णिमा , स्वांतत्र्य दिन , प्रजासत्ताक दिन , डॉ.आंबेडकर जयंती या सणांसाठी अनुज्ञेय असतील .
जिल्हा परिषद अनुदान : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळा / महाविद्यालयांना अनुदान उपलब्ध करुन देणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 08 ऑक्टोंबर 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सेवानिवृत्ती वेतनाकरीता निधीचे वितरण : राज्यातील पाणीपुरवठा योजनांवरील रुपांतरीत नियमित अस्थायी ( सीआरटी ) आस्थापनेवारी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 या आर्थिक वर्षातील सेवानिवृत्ती वेतनाकरीता संबंधित जिल्हा परिषदांना निधींचे वितरण करण्याबाबत लेखाशिर्ष 22151914 नुसार मंजूरी देण्यात येत आहे .
याबाबतचे सर्व चारही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी शासन निर्णय (GR)
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.