राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण समिती 2024 संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दिनांक 04.04.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee imp Shasan Nirnay Dated 04.04.2024 ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण समिती 2024 च्या कामकाजासाठी सेवा अधिग्रहीत करणेबाबत राजय शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , करण्यात आलेला आहे .

 राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 16 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषगांने सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करुन त्याबाबत शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती , 2024 ची स्थापना करण्यात आली असून समितीस स्थापनेच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आता शासनास अहवाल सादर करावयाचा आहे .

यामुळे वेतनत्रुटी निवारण समिती 2024 च्या कामाकाजासाठी श्रीमती वृषाली भिगार्डे , कक्ष अधिकारी जलसंपदा विभाग यांच्या सेवा अधिग्रहीत करुन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत . श्रीम.वृषाली भिंगार्डे , कक्ष अधिकारी यांच्या सेवा वेतनत्रुटी निवारण समिती , 2024 च्या कामकाजासाठी 06 महिने अथवा समिती आपला अहवाल शासनास सादर करण्यापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहीत करण्यात येत आहेत .

श्रीम.वृषाली भिंगार्डे कक्ष अधिकारी यांच्या सेवा वेतनत्रुटी निवारण समिती , 2024 च्या कामाकाजासाठी 06 महिने अथवा समिी आपला अहवाल शासनास सादर करणेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहीत करण्यात येत आहेत . श्रीम.भिंगार्डे यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहीत करण्यात येणार असल्याने , त्यांच्या वेतनादी विषयक बाबी जलसंपदा विभागाकडून हाताळण्यात येतील .

श्रीम.भिंगार्डे यांनी इतर कोणत्याही आदेशाची प्रतिक्षा न करता दिनांक 05.04.2024 रोजी वित्त विभाग / सेवा -9 येथे रुजु अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदरचे आदेश हेच कार्यमुक्ततेचे आदेश असून , संबंधित विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची आवश्यता नसेल असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment