Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay dated 01 January 2025 ] : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदर शासन निर्णयानुसार अधिकारी / कर्मचाऱ्यांचे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज / लाभ इ.रक्कमा शासनांचे लेख्यात समायोजित करण्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .
सदरच्या निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात आली असून , योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेली आहे .
तसेच यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , परिभाषित अंशदान निवृत्तीवेनत योजना दिनांक 01 एप्रिल 2015 पासुन केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ( NPS ) ची कार्यपद्धती वित्त विभागाच्या दिनांक 06.04.2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार विहीत करण्यात आली आहे . तसेच परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 लागु करण्यात आली आहे .
अशा प्रकरणी शासनांचे अंशदान व त्यावरील लाभ / व्याज शासनाच्या लेख्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा तद्नंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजु झालेल्या ज्या अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 च्या तरतुदी लागू ठरल्या आहेत …
अशा अधिकारी / कर्मचारी यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली असल्यास , सदर कर्मचाऱ्यांचे केवळ त्यांचे अंशदान व त्यावरील व्याज देय ठरेल , अशी तरतुद करण्यात आली आहे . तथापि सदर प्रकरणी शासनांचे / नियोक्त्यांचे अंशदान व त्यावरील व्याजाची रक्कम सदर निर्णयांमध्ये नमुद मुख्य लेखाशीर्ष अंतर्गत शिल्लकी जमा राहणार आहेत ..
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.