राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून दि.07.01.2025 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay about pension ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या / निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्युनंतर अविवाहीत , घटस्फोटीत अथवा विधवा मुलीला व मनोविकृती अथवा मानसिक दुर्बलता असणाऱ्या अथवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपण / विकलांगता असणाऱ्या अपत्यास कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत , मार्गदर्शक सुचना देणेबाबत वित्त विभागांकडून दिनांक 07 जुन 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अविवाहीत , घटस्फोटित अथवा विधवा मुलींच्या बाबतीत मुलीला 24 वर्षे वय पुर्ण झाल्याच्या नंतर हयातभर , तिचा विवाह / पुनर्विवाह होईपर्यंत अथवा तिने उपजिविकेची सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर परिपत्रकांमध्ये नमुद अटींच्या अधिन राहून कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आले आहेत .

तसेच यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन प्रकरणांमध्ये त्यांच्या अन्य पात्र कुटुंब निवृत्तीवेतनधारक , वारसदारांसह प्रदान आदेशांमध्ये त्यांच्या अविवाहीत , घटस्फोटित किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात यावा असे नमुद करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर कार्यालय प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतनाचे प्रकरण तयार करतानाच नमुना 03 मध्ये कुटुंबाचा तपशिल , अपत्यंचा जन्म दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह निवृत्तीवेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडे मंजूरीकरीता पाठवावेत असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच विधवा मुलींच्या बाबतीत तिच्या पतीचा मृत्यु व घटस्फोटित मुलीच्या बाबतीत कायदेशिर घटस्फोट , शासकीय कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्तीवेतन धारकांच्या अथवा त्यांच्या किंवा तिच्या जोडीदारांच्या हयातीत झाला असणे आवश्यक असणार आहेत .

तसेच घटस्फोटाची कार्यवाही , शासकीय कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्तीवेतनधारकांच्या / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल , परंतु त्यांच्या मृत्युनंतर घटस्फोट झाला असेल तर , घटस्फोटित मुलीला , घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्ती वेतन प्रदेय ठरेल असे नमुद करण्यात आले आहेत .

ज्या कुटुंब निवृत्तीवेतनधारक अविवाहीत अथवा विधवा अथवा घटस्फोटित मुलीला अधिसूचनेच्या दिनांकापासून , म्हणजे दिनांक 08 फेब्रुवारी 2024 पासुन कुटुंब निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहील असे नमुद करण्यात आले आहेत . तथापि त्यांना दिनांक 08 फेब्रुवारी 2024 पुर्वीची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच मनोविकृती अथवा मानसिक दुर्बलता असणाऱ्या अथवा शारिरीकदृष्ट्या पांगळेपण अथवा विकलांगता असणाऱ्या अपत्यास अथवा अविवाहीत अथवा विधवा अथवा घटस्फोटित मुलगी म्हणून कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची माहिती निवृत्ती वेतन वाहीनी प्रणालीत संकलीत करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment