राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे बाबतीत दिनांक 2 जून 2023 रोजी राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना हि केंद्र पुरस्कार योजना राबविण्यात येते . सन 2023- 24 आर्थिक वर्षाकरिता मागणी एक्स 01 मुख्य लेखाशीर्ष 2226 पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांवर माहे एप्रिल ते मे 2023 च्या वेतनाकरिता 134,60 .80 लक्ष रुपये एक निधी वितरित व खर्च करण्यास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे .
यामध्ये पोषण आहार या लेखाशीर्ष करिता 831 लाख रुपये निधी वितरीत करण्यात आले आहेत .तर अंगणवाडी सेवा आस्थापना करिता 217 लाख रुपये तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी 2173 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना 4% DA वाढीची तारीख झाली निश्चित !
त्याचबरोबर जिल्हा परिषद आस्थापना साठी 1481 इतका निधी अदा करण्यात आलेला आहे ,तसेच अतिरिक्त राज्य हिस्सा वेतन अनुदाने याकरिता 1227 रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे .
सदर निधी वितरण शासन निर्णयामुळे राज्यातील वरील नमूद कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल व मे 2023 चे वेतन वेळेत अदा करण्यात येणार आहेत .अधिकारी / कर्मचारी यांचे माहे एप्रिल व मे महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी निधींचे वितरण करणेबाबतचा GR डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे ..
आपण जर शासकीय / निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुप मध्ये सामिल व्हा !