Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 27 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 च्या नियम 65 नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वयाच्या 50/55 व्या वर्षी अथवा 30 वर्षे अर्हताकारी सेवा यापैकी जे अगादेर घडेल त्यावेळी त्यांची सेवा पुनिर्वलोकन करण्यासंदर्भात शासनाचे धोरण होते .

गट अ आणि ब राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी : शासन सेवेत वयाच्या 35 व्या वर्षांपूर्वी आलेले अधिकारी / कर्मचाऱ्यांचे त्यांच्या वयाच्या 50 वर्षे पुर्ण होतेवेळी किंवा त्यांच्या अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण होत असताना जी अगोदर घडेल त्यावेळेला एकदाच पुनर्विलोकन करण्याचे नमूद करण्यात आली आहे .

संवर्ग ब ( अराजपत्रित ) संवर्ग क आणि संवर्ग ड चे कर्मचाऱ्यांसाठी : संवर्ग ब ( अराजपत्रित ) संवर्ग क आणि संवर्ग ड कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या वयाच्या 55 व्या वर्षी अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण होईल , यापैकी जे अगोदर घडणार आहे , त्या वेळी पुनर्विलोकन करणे आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे . पुनर्विलोकन करताना शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची शासन सेवा पुढे चालु ठेवण्याची पात्रापात्रता आजमावण्यासाठी विहीत निकषांच्या आधारे त्यांचे पुनर्विलोकन करुन सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी / कर्मचारी यांनाच लोकहितास्तव शासन सेवेत पुढे चालु ठेवावयाचे आहे व कार्यक्षम तसेच संशयास्पद सचोटी असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना मुदतपुर्व सेवानिवृत्त करावयचे आहेत .

सविस्तर शासन निर्णय पाहा

शासन सेवेत वयाच्या 35 व्या वर्षांनंतर सेवेत अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठीची तरतुदी : तसेच शासन सेवेत 35 वर्षानंतर सेवेत आलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांचे वयांच्या 55 व्या वर्षी पुनर्विलोकन करावयाचे आहेत .

तसेच प्रत्येक केलेंडर वर्षात दिनांक 01 ऑगस्ट रोजी पात्रतापात्रता तपासाण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची वयाची 49/54 किंवा अर्हताकारी सेवेची 30/35 वर्षे पुर्ण करणे यापैकी जे अगोदर घडेल , त्यावेळी त्यांची सुची तयार करणे अपेक्षित असून कॅलेंडर वर्षाच्या शेवटपर्यंत ( म्हणजे दिनांक 30 डिसेंबर पर्यंत ) विभागीय पुनर्विलोकन समिती , विशेष पुनर्विलोकन समिती यांनी कार्यवाही पुर्ण करणे अपेक्षित आहे .

या संदर्भात राज्य शासनांकडून दिनांक 27 जुन 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय ( gr ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *