Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे  शासकीय / निमशासकीय कर्मचारी यांच्यासह व कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसलेली कुटुंबे यामध्ये राज्यातील शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक .28 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांकडून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेचे विस्तारीकरण करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .यानुसार आता सध्या आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये 5 लाख रुपये एवढे आहे तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.5 लाख रुपये एवढे असणार आहेत . आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये 5 लाख एवढे करण्यात येत आहेत .

या योजेनचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनांकडून चार विभागांमध्ये विभक्त केले आहेत . यांमध्ये गट अ संवर्गांमध्ये पिवळी अन्नपुर्णा योजना आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे असणाऱ्या नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे . तर गट ब संवर्गांमध्ये शुर्भ शिधापत्रिकाधारक कुटुंबे ( शासकीय / निमशासकीय कर्मचारी यासह ) व कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेले कुटुंबे यामध्ये राज्यातील शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश होणार आहे .

हे पण वाचा : Old Pension : जुनी पेन्शन योजना संदर्भात आत्ताची मोठी अपडेट, राज्य कर्मचाऱ्यांनी बांधली वज्रमूठ!

तर गट क संवर्गांमध्ये गट अ व गट ब यांमध्ये समाविष्ट न होणारे शासकीय / शासनमान्य आश्रमशाळेतील विद्यार्थी , शासकीय / शासनमान्य अनाथाश्रमातील मुले , शासकीय / शासनमान्य महिला आश्रमातील मुले , शासकीय / शासनमान्य वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक , माहिती व जनसंपर्क कार्यालयातील निकषानुसार पत्रकार व ज्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामकार कल्याणकारी मंडळातील नोदणी जिवित महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे यांचा समावेश होणार आहे .

तर गट ड संवर्गांमध्ये लाभार्थ्यांच्या अ , ब , क या गटांमध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्टा बाहेरील व देशाबाहेरील रुग्ण यांचा समावेश होणार आहे .प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 1356 उपचारांची यांदी सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेली आहे , सदर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *