Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP GR About GPF ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक .02 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची भविष्य निर्वाह वार्षिक मर्यादा एका वित्तीय वर्षात आयकर नियमावली 1962 च्या नियम 9 ( घ ) उप नियम 2 च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड ग च्या उप खंड (i) मध्ये दिलेल्या मर्यादेत सिमित ठेवणेबाबत , शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , भारत सरकार , कार्मिक , लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय ( पेन्शन आणि भोगी कल्याण विभाग ) यांच्या भारत सरकार कार्मिक , लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय नवी दिल्ली अधिसुचना दिनांक 15.06.2022 नुसार , महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 मधील नियम क्रमांक 8 मध्ये वित्तीय वर्षातील नियमित वर्गणी व थकबाकी मिळून येणारी रक्कम आयकर नियमावली , 1962 च्या नियम 9 ( घ ) उप नियम ( 2 ) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड ( ग ) च्या उप खंड ( I ) मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक नसेल ..
अशी सुधारण तसेच अनुषंगिक नियम क्रमांक 7 व नियम क्रमांक 11 मध्ये अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी संदर्भांकित क्रमांक 4 येथील 1.12.2023 च्या परिपत्रकानुसार सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत . या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात येते की , सदर परिपत्रकात दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घेणेबाबत सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सुचित करण्यात येण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 02 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..