Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State employee HRA update news ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या ( HRA ) दरात दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन सुधारणा करणेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत राज्याचे प्रधान सचिव / अपर मुख्‍य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांच्या प्रति मागणीचे पत्र दिनांक 18.07.2024 रोजी सादर करण्यात आलेले आहेत .

सदर मागणीपत्रांमध्ये केंद्र शासनांच्या विविध ज्ञापनांच्या संदर्भिय विषयानुसार निवेदन सादर करण्यात आले आहेत , यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन महागाई भत्ता 50 केल्यावर , घरभाडे भत्ता दरात ही 9 टक्के , 18 टक्के , 27 टक्के वरुन 10 टक्के , 20  टक्के , 30 टक्के अश वाढ करण्यात आलेली आहे . मात्र महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागाच्या दिनांक 10.07.2024 रोजीच्या निर्णयानुसार राज्य कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दर हा 46 टक्के वरुन 50 टक्के करण्यात आलेला आहे .

त्यामुळे घरभाडे भत्ता दरात देखिल दरवाढ मिळणे अपेक्षित आहे . मात्र ती वाढ मिळतांना दिसत नाही , किंबहुना ती HRA दरवाढ लागु होण्यासाठी राज्य शासनांच्या वित्त विभागाच्या दिनांक 05 फेब्रुवारी 2019 रोजीच्या निर्णयानुसार चुकीची वाक्यरचना कारणीभूत ठरत असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच वित्त विभागाच्या सदर निर्णयात पहिल्या परिच्छेदात महागाई भत्ता 25 टक्के ची मर्यादा ओलांडेल तेव्हा X , Y  , Z या वर्गीकृत शहर / गावांसाठी मिळणार घरभाडे भत्ता हा 24 टक्के , 16 टक्के व 8 टक्के वरुन 27 टक्के , 18 टक्के , 09 टक्के अशी वाढ होईल असे नमुद आहे , इथपर्यंत वाक्यरचना बरोबर आहे . परंतु त्यानंतर च्या वाक्यरचनेत ज्यावेळी महागाई भत्याची रक्कम ही 50 टक्यांपेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30 टक्के , 20 टक्के , 10 टक्के अशी वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असे नमुद करण्यात आलेले आहेत .

असा चुकीचा शब्दप्रयोग करण्यात आलेला असून , जेव्हा की इथेही केंद्र सरकारच्या दिनांक 07 जुलै 2017 रोजीच्या पत्रानुसार ज्योवळी महागाई भत्ता 50 टक्के मर्यादा ओलांडेल , तेव्हा घरभडे भत्ता वाढ असा शब्द असणे अपेक्षित होता , परंतु इथे जेव्हा 50 टक्के पेक्षा जास्त हा शब्दप्रयोग वापरल्या गेल्याने आज रोजी राज्य कर्मचाऱ्याना सुधारित घरभाडे भत्ता वाढ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .

केंद्र शासनांच्या विविध विभाग अंतर्गत महागाई भत्ता हा 50 टक्के झाल्यामुळे घरभाडे भत्ता दरात 10 टक्के , 20 टक्के , 30 टक्के प्रमाणे सुधारित दरवाढ करण्यात आल्याचे लेखी आदेश दिलेले आहेत , केंद्र शासनाच्या प्रत्येक विभागात ही घरभाडे दरवाढ मिळालेली आहे . मात्र महाराष्ट्र शासन आदेशात चुकीची वाक्यरचना झाल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना ही घरभाडे भत्ता वाढ मिळत नाही . त्यामुळे आज प्रत्येक कर्मचाऱ्याचे दरमाह सरासरी किमान 500/- रुपये पासुन 1500/- रुपये पर्यंतचे नुकसान होत आहेत , शिवाय दिनांक 01 जानेवारी 2024 ते दि . 30 जुन 2024 असा 06 महिन्यांची घरभाडे भत्ता थकबाकीचे सरासरी 3000/- रुपये पासुन 9000/- रुपये पर्यंतचे नुकसान होत असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

तर सदर बाबींचा विचार करुन राज्य शासनांकडून सदर निर्णयांमधील वाक्यरचनेत सुधारणा करावी व राज्य कर्मचारी / अधिकारी यांना दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन घरभाडे भत्ता वाढीचा फरक ही जुलै 2024 च्या वेतनासोबत मिळावा अशी विनंती करण्यात आलेली आहे .

या संदर्भातील सविस्तर निवेदन पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *