Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee House Rent Allowance ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना कामांच्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी घरभाडे भत्ता वेतनांमध्ये अदा करण्यात येत असतो . परंतु बऱ्याच वेळा कर्मचारी हे कामाच्या ठिकाणी वास्तव्य करीत नसल्याने ,घरभाडे भत्ता रोखण्यात येत असतो .
तर अनेक वेळा कर्मचारी कामाच्या ठिकाणी वास्तव्य होत नसल्याने , सदर कर्मचाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करण्यात आलेले आहेत . राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडुन निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे बंधनकारक आहे . सदर कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार मुळ वेतनाच्या 9 टक्के रक्कम घरभाडे भत्ता म्हणून देण्यात येते .
नांदेड जिल्ह्यातील 318 कामाच्या ठिकाणी वास्तव्यास राहत नसल्याने , सदर कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध सरकारची फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले होते , यांमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद शिक्षक , ग्रामसेवक यांचा समावेश आहे . सदर प्रकरणांमध्ये शिक्षकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्हा हा औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला होता , परंतु या निर्णयास आता सर्वोच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे . यांमध्ये राज्य सरकारला आपली भुमिका मांडण्यासाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे .
318 कर्मचाऱ्यांच्यामध्ये 292 शिक्षकांचा समावेश आहे तर 26 ग्रामसेवकांचा समावेश आहे . सदरचे कर्मचारी हे कामाच्या ठिकाणी वास्तव न करता घरभाडे भत्ताचा लाभ घेतल्या प्रकरणी दिनांक 10.07.2022 रोजी अर्धापुर पोलिस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी गुन्हा दाखल केला आहे .
औरंगाबाद खंडपीठाने शिक्षकांवरील गुन्हा रद्द केल्याने , सामाजिक कार्यकर्ते सय्यद युनुस यांनी थेट सर्वोच्च न्यायालयांमध्ये धाव घेतली यामुळे आता यावर राज्य सरकारला घरभाडे भत्ता बाबत आपली भुमिका मांडण्यासाठी दिनांक 08 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे , यांमध्ये राज्य सरकार कोणती भुमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत .
सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार , मूळ वेतनाच्या 9% / 18% / 27% टक्के घरभाडे भत्ता देण्यात येते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.