Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee HRA ] : शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता वाढीबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे व वाहन भत्तामध्ये डी.ए मध्ये 25 पेक्षा अधिक वाढ झाली होती . त्यावेळी महागाई भत्तांमध्ये वाढ करण्यात आलेली होती , आता डी.ए मध्ये दुप्पट वाढ होणार असल्याने घरभाडे भत्ता / वाहन भत्तांमध्ये वाढ लागु करण्यात येणार आहे .
राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांच्या शासन आदेशांनुसार , महागाई भत्तातील वाढीनुसार घरभाडे भत्ता मधील वाढ नियोजित करण्यात आली आहे . सदर परिपत्रकांनुसार , शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यावेळी महागाई भत्ता 25 टक्क्यांची मर्यादा ओलांडली त्यावेळी X , Y , Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27% , 18% , 9% दराने घरभाडे लागु करण्यात आला .
डी.ए 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता मध्ये वाढ : सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना ज्यावेळी डी.ए चे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक होईल त्यावेळी X , Y , Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30% , 20% , 10% अशा दराने वाढीव घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असे नमुद करण्यात आले आहेत .
यानुसार माहे जानेवारी महिन्यांत महागाई भत्तांमध्ये आणखीण 5 टक्के वाढ लागु केल्यास , राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 51 टक्के म्हणजे 50 टक्के पेक्षा अधिक होईल . त्यावेळी सातव्या वेतन आयोगांनुसार वेत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करण्यात येईल .
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागांमार्फत सातव्या वेतन आयोगानुसार डी.ए मध्ये वाढ झाल्यास घरभाडे भत्ता मध्ये वाढ करणेबाबत नियोजित दर बाबतचा दि.01 जानेवारी 2019 रोजीचा सविस्तर शासन आदेश पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.