Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ Government Employee DA , HRA , TA Increase News ] : बऱ्याच दिवसांपासून सोशल मिडियांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता , प्रवास भत्ता मध्ये वाढ होणार याबाबत अनेक बातम्या प्रसारित होत आहेत , याचे मुळ आधार म्हणजे महागाई भत्तांमध्ये कमालीची वाढ तसेच वाढती महागाईची प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांना देय भत्यांमध्ये वाढ होत असते .
महागाई भत्ता वाढ : आपणांस माहित असेलच कि , सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वर्षांतुन दोनदा ( जुलै व जानेवारी ) वाढ करण्यात येत असते . सध्याच्या घडीला सरकारी कर्मचाऱ्यांचा माहे जुलै 2023 पासून 46 टक्के आहे . तर यांमध्ये आणखीण जानेवारी 2024 मध्ये 5 टक्के वाढ झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50 टक्के पार करेल व ज्यामुळे घरभाडे भत्ता व वाहन भत्तामध्ये सुधारणा करणे अपेक्षित आहे .
घरभाडे भत्ता (HRA) वाढ : घरभाडे भत्ता मध्ये कर्मचाऱ्यांच्या वास्तवाच्या ठिकाणानुसार X , Y , Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये अनुक्रमे 3 % , 2% आणि 1 % वाढ करण्यात येईल .ज्यामुळे सुधारित घरभाडे भत्ता हा 30 टक्के , 20 टक्के आणि 10 टक्के होईल .
फिटमेंट फॅक्टर मधील वाढ : फिटमेंट फॅक्टर मध्ये देखिल सुधारणा करण्यात येणार आहे , यासाठी सन 2026 पर्यंत वाट पाहावी लागेल , कारण नविन वेतन आयोग हा सन 2026 मध्ये नियोजित आहे . सध्या सातव्या वेतन आयोगांनुसार कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतन अदा करण्यात येत आहे , तर नविन वेतन आयोग हा 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे निश्चित करण्यात येणार आहे .
ज्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 8,000/- रुपयांनी तर राज्यातील कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 6000/- रुपयांनी वाढणार आहे .ज्यामुळे एकुण किमान मुळ वेतनांमध्ये मोठी वाढ होईल तसेच इतर देय भत्यांमध्ये देखिल वाढ होईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.