Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee house rent allowance increase update ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता व त्या अनुषंगिक भत्त्यात वाढ करणे संदर्भात महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
सातवा वेतन आयोगातील तरतुद : सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार , राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता व इतर देय भत्त्यांमध्ये वाढ करणे संदर्भात , दिनांक 09 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्य शासनांस ( राज्याचे मा.मुख्यमंत्री ) यांच्या प्रति निवेदन पत्र सादर करण्यात आलेले आहेत .
महागाई भत्ता व घरभाडे भत्ता : महागाई भत्ता ज्यावेळी 50 टक्के पेक्षा अधिक होईल , त्यावेळी इतर देय भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची तरतुद सातवा वेतन आयोगांमध्ये नमुद आहे . तसेच वित्त विभागाच्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये देखिल डी.ए चे दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्यामध्ये वाढ करण्याची तरतुद नमुद आहे .
घरभाडे भत्ता किती वाढणार ? : महागाई भत्ताचे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , म्हणजेच माहे जुलै 2024 पासुन घरभाडे भत्ताचे सुधारित दर लागु होतील . सध्य स्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ( कार्यालयाच्या ) ठिकाणानुसार , 27 टक्के , 18 टक्के व 9 टक्के असे तीन श्रेणीत घरभाडे भत्ता दर दिला जातो . तर आता डी.ए चे दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्याने , वास्तव्याच्या ठिकाणानुसार 30 टक्के , 20 टक्के व 10 टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.