Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Home Loan Agrim ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरबांधणी अग्रीमाची कमाल मर्यादेत सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 01मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी विषयक विविध प्रयोजनांसाठी घर बांधणी अग्रीम मंजूर करण्याकरीता 7 व्या वेतन आयोगानुसार मुळ वेतन विचारात घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . वित्त विभागाच्या दि.16.12.2016 रोजीच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार X , Y , Z  श्रेणीतील शहरांमध्ये घर / जमीन / सदनिका खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादा ही पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत .

घरबांधणी अग्रीम मंजूरीकरीता घराची किंमत मर्यादा : वित्त विभागाच्या दिनांक 16.12.2016 रोजीच्या निर्णयानुसार घोषित करण्यात आलेल्या एक्स आणि वाय या श्रेणीतील शहरांमध्ये नविन बांधावयाच्या अथवा विकत घ्यावयाच्या तयार नविन घराची / जुन्या घराची किंमत मर्यादा कमाल 2.00 कोटी व त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणांकरीता कमाल 1.00 कोटी अशी विहीत करण्यात येत आहेत .

घरबांधणी अग्रीमाची वसुली : सदर घरबांधणी अग्रीमाची व्याजासह वसुली अग्रीमधारकाच्या सेवानिवृत्तीपुर्वी करण्यात येईल , अशा पद्धतीने नियोजन केले जाईल . वरील नमुद अ , इ व फ मधील प्रयोजन करीता कमाल 20 वर्षात , प्रथम 192 मासिक हप्त्ये मुळे अग्रिम व नंतर 48 मासिक हप्त्यांमध्ये व्याजाची वसुली करण्यात येते  . तर ब व क आणि ड मधील प्रयोजन करीता घेण्यात आलेल्या अग्रिमाची वसुली ही व्याजासह कमाल 96 मासिक हप्त्यात प्रथम 72 मासिक हप्त्यात मुळ अग्रिम व नंतर 24 मासिक हप्त्यात व्याजाची रक्कम वसुल करण्यात यावीत . तसेच अग्रीम धारक त्याच्या इच्छेनुसार कमी कालावधीत अग्रीम व व्याजाची रक्कम फेडण्यासाठी मासिक हप्त्याची रक्कम वाढवू शकणार आहेत .

अथवा घरबांधणी अग्रीमाची रक्कम ही एकरकमी मंजूर केली  असल्यास , अग्रीमाच्या वसुलीची सुरुवात ही अग्रीमाची रक्कम वितरीत केल्याच्या नंतर लगतच्या महिन्यांपासून करण्यात येईल .

घरबांधणी अग्रीम मंजुरीकरीता पुढील अटी व शर्ती लागु असतील : 1 ) यांमध्ये ज्यांना यापुर्वी घरबांधणी अग्रीम हे मंजुर करावयाचे आहे , अशा अधिकारी / कर्मचाऱ्याची शासनाच्या सेवेमधील नियुक्ती संबंधित एकाच्या सेवा भरती नियमानुसार करण्यात आलेली असली पाहिजे आणि अशा प्रकारे करण्यात आलेल्या नियुक्ती नंतर कमीत कमी पाच वर्षांची सेवा झाली असली पाहिजे , त्याचप्रमाणे अग्रीम मंजूर करतेवेळी अधिकारी / कर्मचारी यांची किमान पाच वर्षे सेवा शिल्लक असेण आवश्कय असेल .

02.घरबांधणी नियम प्रयोजन करीता कोणत्याही प्रयोजनाकरीता अग्रीम घेण्याकरीता नोंदणीकृत गहाणखत आवश्यक असेल , तसेच वैयक्तिक बंधपत्र / जामीनखत इ.कागतपत्रांची आवश्यकता असेल . घराच्या किंमती इतका घराचा विमा शासकीय विमा संचालनालयाकडे उतरावा लागेल व तो सतत चालु राहील याची अग्रीम धारकाने दक्षता घेणे आवश्यक असेल .

03.पत्नी , पती दोघेजन जर सरकारी कर्मचारी असतील तर अशा प्रकरणी दोघांपैकी एकालाच घरबांधणी अग्रिम अनुज्ञेय असेल , तसेच दिनांक 01.05.2001 रोजी अथवा त्यानंतर 02 पेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही .

04.तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना घरबांधणी अग्रीम मंजूर करत असताना त्यांच्याकडे शिल्लक घरबांधणी अग्रीम मुद्दल व व्याज याची वसुली त्या अधिकारी / कर्मचारी यांच्या देय सेवा निवृत्ती उपदान अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनाच्या रकमेतून वसूल करण्या संदर्भात संमती पत्र देणे आवश्यक असणार आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 01 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *