Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Group Insurance New Primium And insurance Benefit Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत गट क व गट ड कर्मचाऱ्यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करणेबाबत वित्त विभगांकडून दिनांक 30 जानेवारी 2016 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना गट विमा योजना 1982 अंतर्गत गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे युनिट्स तसेच मासिक वर्गणीचे दर व त्यानुरुप मिळणारे लाभ यांमध्ये दिनांक 01 जानेवारी 2016 पासून सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . त्यानुसार गट क व गट ड संवर्गातील सध्या अस्तित्वात असलेले युनिट्स तसेच वर्गणी ऐवजी खाली नमुद केल्याप्रमाणे गट विमा योजनांच्या सुधारित युनिट्स तसेच वर्गणी सदर योजना लागु असणाऱ्या संवर्ग क व ड मधील कर्मचाऱ्यांकडून जानेवारी 2016 पासूनच्या वेतनातुन वसूल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
वरील प्रमाणे सुधारित युनिट्स व सुधारित दर हे दिनांक 01 जानेवारी 2016 पासून लागु करण्यात आलेले आहेत . सदर सुधारित युनिट्स तसेच वर्गणीचे आदेश निर्गमित करुन त्याची सेवापुस्तकात नोंद करुन घेणे आवश्यक असणार आहेत . तसेच माहे जानेवारी 2016 या महिन्याची सुधारित वर्गणीच्या फरकााची रक्कम बिनव्याजी माहे फेब्रुवारी 2016 च्या वेतनातुन वसुल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
शासकीय कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर अथवा मृत्यु नंतर सदर गट विम्याची रक्कम प्रदान करण्यात येते . सदर शासन निर्णयानुसार शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास कुटुंबियांना ( गट क संवर्ग मधील ) – 3,60,000/- रुपये तर गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 2,40,000/- इतकी रक्कम अदा करण्यात येते .तर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांस त्याच्या जमा असणारी गट विम्याची सर्व रक्कम + व्याज सह अदा करण्यात येते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.