Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee gpf scheme update paripatrak ] : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागु असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करणेबाबत , राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 08 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .

सदर शासन निर्ण्यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , भविष्य निर्वाह निधीचे संपुर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहे , परंतु अद्याप पर्यंत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पावत्या न मिळणे , ऑनलाईन लेखा अद्यावत नसणे , बदली झालेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी लेखे वर्ग न होणे इ.तक्रारींच्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधी वर्ग करणे इ. बाबी करण्यासाठी..

 जिल्हास्तरावर विशेष कार्यशाळा आयोजित करुन एक महिन्यांच्या कालावधीत सर्व बाबींची पुर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदरचा कार्यवाही ही शासन पत्र क्र.24.06.2024 रोजीच्या संदर्भाधीन पत्रांनुसार राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक , शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदा सर्व , शिक्षण निरीक्षक मुंबई , अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व यांच्या प्रति शिक्षण संचालक पुणे यांच्याकडून सादर करण्यात आलेले आहेत .

तसेच यांमध्ये नमदु करण्यात आलेले आहेत कि , विहीत मुदतीनंतर शिक्षण संचालक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे हे स्वत : आढावा घेणार आहेत , विहीत मुदतीमध्ये भविष्य निर्वाह निधीचे सर्व लेखे अद्ययावत न झाल्याचे दिसून आल्यास संबंधित जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षण मुंबई सर्व व अधिक्षक , वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्यावर जबाबदार निश्चित करुन म.ना.सेवा वर्तवणूक नियम 1979 नियम 3 प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *