राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! महागाई भत्ता वाढीबरोबरच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार ! राज्य सरकारकडून प्रस्तावाची तयारी !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढीबरोबरच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार आहे . या संदर्भात राज्य शासनांकडून आनंदाची बातमी समोर येत आहे , या संदर्भात राज्य शासनांकडुन प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्य शासनांकडून नमुद करण्यात आले आहेत .

महागाई भत्ता मध्ये आणखीण 3 ते 4 टक्के वाढ ! – राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जुलै महिन्यांपासून डी.ए मध्ये आणखीण 3 टक्के ते 4 टक्क्यांची वाढ होणार आहे .सध्या राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना एकुण 42 टक्के दराने महागाई भत्ता ( Dearnes allowance ) मिळतो , यांमध्ये माहे जुलै 2023 पासून आणखीण 3 टक्क्यांची वाढ लागु करणे निश्चित करण्यात आलेले आहेत .

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्तांमध्ये वाढ करण्यात येत असते , केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून जाहीर केलेल्या निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्तांमध्ये आणखीण तीन टक्के वाढ लागु होते .सरकारी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती कि , महागाई भत्तांमध्ये आणखीण चार टक्के वाढ होईल परंतु ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डी.ए मध्ये तीन टक्केच वाढ निश्चित करण्यात आलेली आहे .सदरचा वाढीव महागाई भत्ता बाबत अधिकृत्त शासन निर्णय या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे :  केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , निर्णय घेतल्यानंतर देशातील इतर 25 राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये केंद्र सरकार प्रमाणे वाढ करणेबाबत , मोठा निर्णय घेण्यात आला आहे . परंतु राज्य शासनांकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही .

परंतु राज्य शासनांकडून राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे मुख्य सचिव यांनी कर्मचारी संघटनेंच्या बैठकीदरम्यान सांगितले होते , याबाबतची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागांकडून करण्यात येईल असे सांगण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment