Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee good news about DA VADH ] : केंद्र सरकारने बुधवारी घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जुलै 2024 पासून डीए फरकासह तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली आहे . महाराष्ट्रात दिनांक 15 ऑक्टोबर पासून , आचारसंहिता सुरू आहे . यातच सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता वाढीची ( 3%) महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे .
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2024 पासून महागाई भत्ता मध्ये तीन टक्क्यांची वाढ जाहीर करण्यात आलेली आहे . यामुळे केंद्रीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना 01 जुलैपासून महागाई भत्त्याचे दर 50% वरून 53% करण्यात आली आहे . या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे .
याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता वाढीची मागणी संघटनेमार्फत करण्यात येत आहे . परंतु राज्यामध्ये आचारसंहिता सुरू असल्याने , या संदर्भातील निर्णय घेणे सरकारला जोखमीचे आहे . परंतु सदरचा निर्णय यापूर्वीच केंद्र सरकारने घेतल्याने , पूर्वी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आचारसंहिता काळामध्ये देखील होऊ शकते अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे .
कारण राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ देण्यात येत असते , त्याच धर्तीवर महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे माननीय मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सादर करण्यात आले आहे .
सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे की सदरचा निर्णय केंद्र सरकारच्या धरतीवर आधारित असून , आचारसंहितेचा यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे . राज्य सरकारकडून नेमका कोणता निर्णय येईल याकडे आता कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे .