मराठी लाईव्ह पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 05 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . राज्य शासन सेवेत कार्यरत / निवृत्तीवेतनधारक यांच्या बाबतीत अखेर राज्य शासनांकडून तीन महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आले आहेत .
यांमध्ये निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दिनांक 01 जानेवारी 2023 पासून 42 टक्के महागाई भत्ता वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 05 जुलै 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतनाच्या एकुण रकमेवर दिनांक 01 जानेवारी 2023 पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर हा 38 टक्के वरुन 42 टक्के असा सुधारित करण्यात आलेला आहे , सदर डी.ए वाढ दिनांक 01 जानेवारी 2023 पासूनच्या थकबाकीच्या माहे जुलै 2023 च्या निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
तसेच दुसऱ्या शासन निर्णयांमध्ये असुधारित वेतनश्रेणीत ( पाचव्या वेतन आयोगानुसार ) निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 01 जानेवारी 2023 पासून 412 टक्के महागाई भत्ता वाढ देण्याबात वित्त विभागांकडून GR निर्गमित करण्यात येत आहे , यामध्ये नमुद करण्यात येत आहे कि , सदर पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा दर 396 टक्के वरुन 412 टक्के करण्यात आला आहे . सदर डी.ए वाढ दिनांक 01 जानेवारी 2023 पासूनच्या थकबाकीसह माहे जुलै 2023 च्या निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतनासोबत रोखीन अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
तिन्ही शासन निर्णय पाहा सविस्तर
त्याचबरोबर असुधारित वेतनश्रेणीत ( सहाव्या वेतन आयोगानुसार ) निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दिनांक 01 जानेवारी 2023 पासून 221 टक्के महागाई भत्ता वाढीचा दर हा 212 टक्के वरुन 221 टक्के रण्यात आलेला आहे सदर दिनांक 01 जानेवारी 2023 पासूनच्या डी. ए थकबाकीसह माहे जुलै 2023 च्या निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
सदर वरील वित्त विभागांकडून दिनांक 05 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले तिन्ही शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !