Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Samuh Apaghat vima Yojana Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतील तरतुदी वगळणेबाबत , निर्णय घेण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन निर्णयानुसार शासन निर्णय क्र.संकीर्ण 2015 / प्र.क्र.45 / विमा प्रशासन दि.04 फेब्रुवारी 2016 मधील परिच्छेद क्र.09 मध्ये प्रत्येक वर्षाच्या मार्च अखेर सेवा निवृत्तीसाठी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहीलेल्या कर्मचाऱ्यांना सदर समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू ठरणार नाही , ही तरतुद वगळण्यात येत आहेत .

शासन निर्णय क्र.संकीर्ण – 2017 / प्र.क्र.69 / विमा प्रशासन दि.11 ऑगस्ट 2017 मधील परिच्छेत क्र.12 मध्ये माहे एप्रिल ते माहे सप्टेंबर या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू ठरणार नाही ही तरतूद वगळण्यात येत आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *