Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP Shasan Nirnay Finance Department ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नविन सेवार्थ प्रणाली अद्यावयात करण्यात येणार आहेत .
राज्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्यस्थितीतील उपलब्ध विदा नविन सेवार्थ प्रणालीत दिनांक 15 नोव्हेंबर 2023 पुर्वी अद्ययावत करण्याबाबत तसेच सदर कार्यवाही पुर्ण केली नसल्यास , माहे नोव्हेंबर 2023 देय डिसेंबर 2023 ची वेतन देयके पारित होणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . परंतु बहुतांश आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडकरील नविन सेवार्थ प्रणालीमधील विदा अद्ययावत होणे शिल्ल्क आहेत , ही बाब पाहता सेवार्थ प्रणालीतील सद्यस्थितीतील उपलब्ध विदा नविन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास मुदतवाढ देण्याची बाबत राज्य शासनांच्या विचाराधीन होती .
यानुसार सदर शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी , अधिदान व लेखा अधिकारी व सर्व कोषागार अधिकारी यांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहेत . यामध्ये सेवार्थ प्रणालीतील सद्य स्थितीतील उपलब्ध विदा नविन सेवार्थ प्रणालीत दिनांक 31 डिसेंबर 2023 पुर्वी अद्ययावत करण्यात करयाचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच सदर कार्यवाही पुर्ण करुन माहे डिसेंबर 2023 देय माहे जानेवारी 2024 ची मासिक वेतन देयके सादर करताना परिपत्रकासोबतच्या प्रमाणपत्रकात आहरण व संवितरण अधिकारी यांच्या स्वाक्षरीने वेतन देयकासोबत सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
तसेच सदरची कार्यवाही पुर्ण केली नसल्यास माहे डिसेंबर 2023 देय माहे जानेवारी 2024 ची मासिक वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालये आणि उप कोषागार कार्यालये येथे स्विकारली जाणार नाहीत याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच सदरची कार्यवाही पुर्ण केली नसल्यास माहे डिसेंबर 2023 देय माहे जानेवारी 2024 ची मासिक वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालये आणि उप कोषागार कार्यालये येथे स्विकारली जाणार नाहीत अशा प्रकारच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
सदर वित्त विभागाचा दिनांक 30.11.2023 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.