Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee February Month Payment Anudan Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी वेतनाकरीता अनुदानाचे वितरण करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

वित्त विभागांकडून अर्थसंकल्पीत वितरण प्रणालीवर ( बीम्स प्रणाली ) प्राप्‍त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी – आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे , आयुक्त क्रिडा व युवक सेवा , महाराष्ट्र राज्य पुणे व सह सचिव / उप सचिव , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय, मुंबई यांना वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .

सदरच्या शासन निर्णयानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागांकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठैवण्याकरीता पुढीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहेत . लेखाशिर्ष निहाय नियंत्रक अधिकारी व वितरीत करण्यात आलेले अनुदान याबाबत , सविस्तर तक्ते पुढीलप्रमाणे पाहु शकता .

वरील निधींचे वितरीत करत असताना वित्त विभागांकडून शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय तसेच शासन परिपत्रके यामधील विहीत सुचना / अटी  त्याचबरोबर मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट -26 मधील तरतुदी विचारात घेवून संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या रक्कमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर ज्या उद्देशा करीता निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत , त्याच उद्देशाकरीता खर्च करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.13.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *