लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : आता राज्य कर्मचाऱ्यांना गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेचे आयोजन विभागीय आयुक्तांकडून करण्यात आले आहेत . या परिक्षेमध्ये कर्मचाऱ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे .परीक्षेचे स्वरुप , प्रश्नसंख्या , परीक्षेचे वेळा , परीक्षेचा दिनांक , परीक्षेचे स्वरुप इ. बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
शिक्षक प्रेरणा परीक्षा : ही परीक्षा औरंगाबाद विभागातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेली असून , सदर परीक्षा स्पर्धात्मक वातावरणात स्वत : गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी या करीता अयोजित करण्यात आलेली आहे .विद्यार्थ्यांना चौफेर ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी , या हेतुने शिक्षक प्रेरणा परीक्षे संदर्भात विभागातील सर्व शिक्षक संघटनांची सदर्भान्वये प्रस्तुत कार्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती .
यानुसाार औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते 10 वी पर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळांतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहेत .सदरची परीक्षा ही शिक्षकांना विषयज्ञानात पारंगत करुन त्यांचे विषयज्ञान वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने घेण्यात येत असून या परीक्षेचा त्यांचे सेवाविषयक बाबीवर कुठलाही परीणाम होणार नसल्याचे स्पष्ट नमुद करण्यात आलेले आहे .
हे पण वाचा : अर्जित रजा रोखीकरण बाबत सुधारित शासन निर्णय !
शिक्षक प्रेरणा ही परीक्षा ऐच्छिक स्वरुपाची असणार आहे परंतु प्रस्तुत परीक्षेच्या निकालानुरुप कुठलीही कारवाई शिक्षकांवर केली जाणार नाही .या परीक्षेमुळे शिक्षकांच्या विषयज्ञान पातळी आजमावून स्वयंअध्ययन होईल .
परीक्षेचे अभ्यासक्रम – शिक्षक प्रेरणा या परीक्षेसाठी इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या SCERT / NCERT पाठ्य पुस्तकातील जीवशास्त्र (BIO ) , भौतिकशास्त्र (Physics ) , Math , English ,रसायनशास्त्र (Chemistry ) इ.विषयासंबंधीचा अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न सदर परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत .गुणानुक्रमे जिल्ह्यातुन प्रथम येणाऱ्या 50 परीक्षार्थींना सत्कारपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करुन CSR / सेस फंडातून भेटवस्तु देवून जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन संदर्भात विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या कडून निर्गमित झालेला सविस्तर परीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .