राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांची परीक्षा आयोजित करणे संदर्भात महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक निर्गमित दि.25.09.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee exme patrak ] : राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांची परीक्षा आयोजित करणे संदर्भात भाषा संचालक महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसिद्ध पत्रक दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर प्रसिद्धी पत्रकारानुसार अधिकारी कर्मचारी यांची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे .

सदरच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की , महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी भाषा संचालना मार्फत घेण्यात येणारी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी मुंबई , पुणे,  नागपूर व छत्रपती संभाजी नगर या चार विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे . सदरच्या परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आवेदनपत्र विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत दिनांक 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवणे आवश्यक असणार आहे .

तर शासकीय सेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी भाषा संचालना मार्फत घेण्यात येणारी मराठी भाषा निम्नस्तर व उच्च स्तर परीक्षा रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे . सदर परीक्षा करिता विहित नमुन्यातील आवेदन पत्रे विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत दिनांक 2 डिसेंबर 2024 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवणे आवश्यक असणार आहे .

अराजपत्रित कर्मचारी व राजपत्रीत अधिकाऱ्यांची अनुक्रमे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 मधील मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत मंडळाच्या सुधारित अभ्यासक्रमाचे इयत्ता नववीसाठी निश्चित केलेले अक्षरभारती या संपूर्ण पुस्तकावर आधारित घेण्यात येणार आहे . तसेच मराठी भाषा उच्चस्तर परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत मंडळाचे सुधारित अभ्यासक्रमाचे इयत्ता दहावीसाठी मार्च / एप्रिल 2018 मध्ये निश्चित केलेले अक्षरभारती या संपूर्ण पुस्तकावर आधारित घेण्यात येईल , तर प्रश्नपत्रिका क्र 02 च्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आला नाही .

परीक्षेकरिता प्रवेश मिळण्यासाठी सदर आवेदन पत्रात उमेदवाराचे संपूर्ण नाव ,कार्यालयाचा संपूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह आवेदन पत्र परिपूर्ण भरून मूळ चलनासह संबंधित कार्याकडे नमूद केलेल्या तारखेपूर्वी पाठवणे आवश्यक असणार आहे .

Leave a Comment